Study From Home Std. 6th 14-06-2020
Good morning children,
How studies are going?
आज दिनांक 14 जून 2020, रविवार (Sunday)
आपण सर्व DIKSHA App च्या मदतीने अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी इथे दीक्षा ऍप इन्स्टॉल करण्याची लिंक देत आहे.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक: बाकी वीस रुपयांचं काय ?
अभ्यास :
पाठाचे वाचन करा. पाठात तुम्हांला राजूचे कोणते गुण दिसले ते लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी आठ-दहा ओळींत माहिती लिहा.विषय : English
Unit : 1, pages 14-15
Read aloud with help of the following video.
अभ्यास : Look at the pictures. Read the questions and answer.
खालील चित्रे पाहून प्रश्नांची उत्तरे द्या.
विषय : गणित
घटक : पूर्णांक संख्या
खालील लिंकच्या मदतीने पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार करण्याची पद्धत समजून घ्या.
अभ्यास : खालील उदाहरणे वहीवर लिहून सोडावा. रिकाम्या जागेत भागाकार व बाकी लिहा.
विषय : विज्ञान
घटक : आपत्ती व्यवस्थापन
खालील लिंकच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या.
अभ्यास :
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्यांचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपमध्ये पाठवा. सोडवताना काही अडचण आली, तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारात येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Comments
Post a Comment