Study From Home Std. 5th 12-06-2020
Good Morning Children,
I hope you all are in good condition and enjoying your study from home.
आज दिनांक 12 जून 2020,शुक्रवार (Friday)
आपण सर्वांनी DIKSHA App वापरून अभ्यासाला सुरुवात केलेली आहेच. ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी इथे लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास भाग १ आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA App मधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंक च्या मदतीने पाठ DIKSHA App मध्ये समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : वल्हवा रं वल्हवा
खालील लिंकला टच करून हा पाठ दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
गाणे तालासुरात म्हणा. जमल्यास मोबाइलच्या मदतीने तुमचा आवाज रेकॉर्ड करा.
विषय : इंग्रजी
घटक : Unit 1 page No. 6
खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे मोठ्याने वाचन करा.
अभ्यास :
विषय : परिसर अभ्यास 1
घटक : पृथ्वीचे फिरणे
खालील लिंकला टच करून सूर्योदय आणि सूर्यास्त दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या तिथींची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या.
विषय : गणित
घटक : संख्याज्ञान
खालील लिंकला टच करून अंकांची स्थानिक किंमत व विस्तारित रूप दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
वर दिलेले प्रश्न इथे सोडवताना काही अडचण आल्यास वहीवर लिहुन देखील सोडवू शकता. अभ्यास पूर्ण झाल्यावर मला आपल्या Whats App ग्रुपवर नक्की कळवा.
Comments
Post a Comment