Study From Home Std. 5th 30-06-2020
Good morning children, How are you? आज दिनांक 30 जून 2020, मंगळवार (Tuesday) आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 👉दीक्षा ऍपची लिंक👈 चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. आज आपण मराठी, English, आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. विषय : मराठी घटक : स्वच्छतेचा प्रकाश या पाठात यदुनाथ थत्ते यांनी ' माझा देश ' या शब्दातून देशप्रेमाची भावना रुजविली आहे. तर, सेनापती बापट यांची 'सफाई काम' हीच देशसेवा असल्याचे डॉ.अनिल गोडबोले यांनी सांगितले आहे. उताऱ्यांचे प्रकट व मूकवाचन करून स्वच्छतेचे महत्व समजावण्यासाठी कृती दिलेल्या आहेत. हे खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून प...