Study From Home Std. 5th 18-06-2020
Good morning children,
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
How are you?
आज दिनांक 18 जून 2020, गुरुवार (Thursday)
आज आपण मराठी, English, आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : जनाई
खालील लिंक च्या मदतीने विरामचिन्हांचा वापर दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. अभ्यास : तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा.
(अ) पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग - ......................................................................
(आ) पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी - .................................................................
(इ) फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे - ......................................................................
(ई) गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ओळी - ..................................................................
Subject : English
Unit : 2, pages 9-10 (पाठ्यपुस्तकातील पान क्र. 23-24)
Read the lesson with the help of the following video. खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.
अभ्यास :
विषय : गणित
घटक : गुणाकार व भागाकार
खालील लिंकच्या मदतीने गुणाकाराच्या पद्धत दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. अभ्यास :
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!
Comments
Post a Comment