Study From Home Std. 6th 11-06-2020
Good Morning Children,
I hope you all are in good condition and enjoying your study from home.
आज दिनांक ११ जून २०२०, गुरुवार (Thursday)
आपण सर्वांनी DIKSHA App वापरून अभ्यासाला सुरुवात केलेली आहेच. ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी इथे लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास भाग १ आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA App मधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंक च्या मदतीने पाठ DIKSHA App मध्ये समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : सायकल म्हणते, मी आहे ना!
खालील लिंकला टच करून हा पाठ दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : हलकीफुलकी म्हणजी खूप हलकी, तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा.
१) कधीमधी २) धामधूम ३) साधेसुधे ४) अवतीभवती ५) फेरफटका
विषय : इंग्रजी
घटक : Unit 1 page 7
Read the story loudly with the help of following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठ दोन-तीन वेळा वाचा.)
अभ्यास :
विषय : गणित
घटक : कोन
खालील लिंकला टच करून दीक्षा ऍप मध्ये कोन हा घटक समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
विषय : विज्ञान
घटक : सजीव सृष्टी
खालील लिंकला टच करून दीक्षा ऍप मध्ये सजीवांची लक्षणे समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ?
सजीव : साप, कासव, कांगारू, गरुड, सरडा, बेडूक, गुलमोहर, रताळ्याचा वेल, डॉल्फिन, मुंगी, रॅटल साप, नाकतोडा, गांडूळ.
वर दिलेले प्रश्न इथे सोडवताना काही अडचण आल्यास, ते प्रश्न वहीवर लिहूनसुद्धा सोडवू शकता. अभ्यास पूर्ण झाल्यावर मला Whats group वर नक्की कळवा.
See you tomorrow!
Comments
Post a Comment