Study From Home Std. 6th 12-06-2020
Good Morning Children,
I hope you all are in good condition and enjoying your study from home.
आज दिनांक 12 जून 2020,शुक्रवार (Friday)
आपण सर्वांनी DIKSHA App वापरून अभ्यासाला सुरुवात केलेली आहेच. ज्यांना DIKSHA App हवे आहे, त्यांच्यासाठी मी इथे लिंक देत आहे. लिंक च्या मदतीने DIKSHA App मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, DIKSHA App मधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंक च्या मदतीने पाठ DIKSHA App मध्ये समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : डॉ. कलाम यांचे बालपण
खालील लिंकला टच करून हा पाठ दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : खालील शब्द वाचा आणि असेच लिहा.
दुर्मिळ, क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, वृत्तपत्रे , ग्रामसभा, महत्त्व, भविष्य , उत्सुक, जिज्ञासू,
वृत्ती , बॅरिस्टर, गिऱ्हाईक, दूरस्थ, दृश्य, युद्ध, कष्ट, स्वयंशिस्त, सर्जनशीलता, स्रोत,
इच्छा , कर्तव्य, नि:संशय.
विषय : इंग्रजी
घटक : Unit 1 page 10
अभ्यास:
विषय : गणित
घटक : कोन
खालील लिंकला टच करून कोन काढण्याची पद्धत दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : कंपासपेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो
दुभागा.
(1) 50° (2) 115° (3) 80° (4) 90°
विषय : विज्ञान
घटक : सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण
खालील लिंकला टच करून वनस्पतींची विविधता दीक्षा ऍप मध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर येऊन पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : खालील आकृतीत दिसणाऱ्या वनस्पतींच्या प्रकारांची यादी करून त्यांचे वर्गीकरण करा. प्रत्येक प्रकाराविषयी थोडक्यात माहिती लिहा.
वरीलपैकी काही प्रश्न इथे सोडवताना काही अडचण आल्यास वहीवर लिहूनसुद्धा सोडवू शकता.
अभ्यास पूर्ण झाल्यावर मला आपल्या Whats App ग्रुपवर नक्की कळवा.😊

Comments
Post a Comment