Study From Home Std. 6th 28-07-2020

Good morning children,
How are you? 

आज दिनांक 28 जुलै 2020, मंगळवार (Tuesday)

आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 
👉दीक्षा ऍपची लिंक👈

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : माय (कविता)
एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी धडपड या कवितेतून दर्शविली आहे. खालील लिंक च्या मदतीने कविता दीक्षा ऍपमध्ये ऐका व म्हणा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
👉लिंक👈
अभ्यास :
Subject : English
Unit: 4, pages 12-13 (Page No. 92-93)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)
अभ्यास :
विषय : गणित 
घटक :नफा-तोटा 
शेकडा म्हणजेच 100 हे आपल्याला माहीत आहे. पण नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी ठरवताना त्यांची तुलना खरेदीच्या किमतीशी करतात. खालील लिंक च्या मदतीने शेकडा नफा व शेकडा तोटा या संकल्पना दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : 
विषय : विज्ञान
घटक : चुंबकत्व  
चुंबकाचा पहिला गुणधर्म आहे.-1) टांगून ठेवलेला चुंबक प्रत्येकवेळी उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर असतो. 2) चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले असते. यावरून असे समजते की, चुंबकाचे बल दोन्ही टोकांना एकवटलेले असते. ३) चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. खालील लिंक च्या मदतीने चुंबकाचे काही गुणधर्म दीक्षा ऍपमध्ये सविस्तर समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :
वरील सर्व विषयांचे प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा. 

Bye! See you tomorrow!!

Comments