Study From Home Std. 6th 03-07-2020

Good morning children,
How are you? 

आज दिनांक 03 जुलै 2020, शुक्रवार (Friday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : ओळख थोरांची
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्ती या क्रीडाप्रकारात पहिले पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा परिचय या पाठात करून देण्यात आला आहे. खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठाचा आशय समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :
Subject : English
Unit : 2, Page 21 (Page No. 48)
Read the text aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने पाठाचे वाचन करा.)

अभ्यास :
विषय : गणित 
घटक : विभाज्यता 
जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 9 ने विभाज्य असते. खालील लिंक च्या मदतीने 3, 4 व 9 च्या विभाज्यतेच्या कसोट्या दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : 

विषय : विज्ञान 
घटक : गती व गतीचे प्रकार 
वस्तूला गती दिली की वस्तूंमध्ये हालचाल घडून येते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. ही गती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्याचीच माहिती घेणार आहोत. खालील लिंक च्या मदतीने गतीचे काही प्रकार दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :

वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा. 

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020