Study From Home Std. 6th 01-07-2020

Good morning children,
How are you? 

आज दिनांक 01 जुलै 2020, बुधवार (Wednesday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल. 

चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता. 
आज आपण मराठी, English, गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.

विषय : मराठी 
घटक : बहुमोल जीवन (कविता)
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये कवितेचा आशय समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :
Subject : English
Unit : 2, Pages 17-18 (Page No. 44-45)
Read to story aloud with the help of the following video. (खालील व्हिडिओच्या मदतीने गोष्टीचे वाचन करा.)

अभ्यास :

विषय : गणित 
घटक : सममिती 
खालील लिंक च्या मदतीने सममिती ही संकल्पना दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास : 
1) दोरा, रंग व घडी घातलेला कागद यांचा उपयोग करून सममित आकार काढा.
2) व्यवहारातील विविध वस्तूंचे निरीक्षण करा. उदाहरणार्थ, झाडांची पाने, उडणारे पक्षी, ऐतिहासिक वास्तूंची
चित्रे इत्यादी. त्यांच्यातील सममित आकार शोधा व त्यांचा संग्रह करा.

विषय : विज्ञान 
घटक : गती व गतीचे प्रकार 
एखाद्या स्थिर वस्तूवर बल लावले तर ती वस्तू आपली जागा सोडते. तिच्या अशा अवस्थेला गतिमान अवस्था म्हणतात. खालील लिंक च्या मदतीने गती ही संकल्पना दीक्षा ऍपमध्ये समजून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. 
अभ्यास :
वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला
वस्तूची गती म्हणतात.
परिसरामध्ये गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यांमध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात, ते लिहा.

वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण अली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता. 

तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा. 

Bye! See you tomorrow!!

Comments

Popular posts from this blog

Study From Home Std. 5th 31-07-2020

Study From Home Std. 6th 08-07-2020

Study From Home Std. 5th 02-07-2020