Study From Home Std. 5th 07-07-2020
Good morning children,
How are you?
आज दिनांक 07 जुलै 2020, मंगळवार (Tuesday)
आपण सर्व DIKSHA App वापरून अभ्यास करत आहातच. रोजच्याप्रमाणे मी खाली दीक्षा ऍपची लिंक दिली आहे. लिंकच्या मदतीने ऍप्प इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला सहज अभ्यास करता येईल.
चला आता अभ्यासाला सुरुवात करू. काही अडचण असल्यास मला आपल्या Whats App ग्रुपवर कधीही विचारू शकता.
आज आपण मराठी, English, आणि गणित या विषयांचा अभ्यास करणार आहोत. खाली विषय, पाठाचे नाव, दीक्षा ऍपमधील त्या पाठाची लिंक दिलेली आहे. लिंकच्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये पाठ समजून घ्या, त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
विषय : मराठी
घटक : प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा (कविता)
खालील लिंक च्या मदतीने दीक्षा ऍपमध्ये कविता ऐका व चालीसह म्हणा. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास : पुढील उतारा वाचा व वहीवर सुवाच्य अक्षरात लिहा.
कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे ध्यास आणि दुसरी म्हणजे अभ्यास. शक्ती आणि युक्ती यांचा योग्य वापर केल्यास कोणत्याही कामातील अडचणी दूर होतात. इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजे माघार घेणे होय, म्हणून यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो.
Subject: English
Unit : 4 pages 10-11 (पाठ्यपुस्तकाचे पान क्र. 56-57)
Read the text aloud with the video.
अभ्यास :
विषय : गणित
घटक : विभाज्य आणि विभाजक
खालील लिंकच्या मदतीने विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे दीक्षा ऍपमध्ये करून घ्या. त्यानंतर back (⬅) बटन दाबून परत या पानावर या आणि पुढे सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा.
अभ्यास :
वरील प्रश्न इथेच सोडवता येतील. प्रश्न सोडवून त्याचा फोटो/स्क्रीनशॉट आपल्या Whats App ग्रुपवर पाठवा. सोडवताना काही अडचण आली तर वहीवर लिहून देखील सोडवू शकता.
तुमच्या शंका, अडचणी खाली Comment मध्ये सुद्धा विचारता येतील. त्यासाठी अगदी वर दिसणारे Subscribe हे बटन दाबून blog चे सदस्य व्हा, मग खाली Enter your comment मध्ये तुमची अडचण लिहा.
Bye! See you tomorrow!!
Comments
Post a Comment